वज्रेश्वरी देवस्थान अध्यक्ष पदी कल्पेश पाटील यांची बिनविरोध निवड

 दीपक हीरे
रविवार, 22 जुलै 2018

वज्रेश्वरी देवस्थान हे महाराष्ट्रातील सर्व भाविक व पर्यटकांमध्ये सुपरिचित असे देवस्थान आहे. वज्रेश्वरी देवी बहुतांश समाजाची कुलदेवता आहे. त्यामुळे या ठिकाणी भविकांची मोठी वर्दळ सुरु असते.

वज्रेश्वरी - ठाणे जिल्ह्यतील सुपरिचित अशा वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानच्या अध्यक्ष पदी वेढेगाव येथील कल्पेश पाटील यांची आज दुपारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भक्त गणसह भाविकांमध्ये पाटील यांच्या निवडीमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

वज्रेश्वरी देवस्थान हे महाराष्ट्रातील सर्व भाविक व पर्यटकांमध्ये सुपरिचित असे देवस्थान आहे. वज्रेश्वरी देवी बहुतांश समाजाची कुलदेवता आहे. त्यामुळे या ठिकाणी भविकांची मोठी वर्दळ सुरु असते. या ठिकाणी येथील मंदिर च्या देखभली साठी धर्मादाय आयुक्त ठाणे यांच्यामार्फत विश्वस्त निवड पाच वर्षा साठी केली जाते. त्यातून अध्यक्ष पद निवडले जाते. आज वज्रेश्वरी देवस्थान येथे झालेल्या निवडी मध्ये कल्पेश अनंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली कल्पेश पाटील हे मन मिलावू व शांत स्वभाव व नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत असल्याने त्यांच्या देवस्थान वर अध्यक्ष पदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे वर अभिनदंन होत आहे. भाविक व ग्रामस्त यांच्या साठी मंदिर परिसर व दर्शनासाठी विशेष सोय तसेच आध्यात्मिक कार्यक्रम मंदिर परिसरसाठी, गोर गरीब जनते साठी देवस्थानच्या माध्यमातून विशेष सह कार्य केले जाईल, असे त्यांच्या कडून सांगण्यात आले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The selection of Kalpesh Patil as the president of Vajreshwari Devasthan