
मुंबईः मुंबई काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांना सुखद धक्का बसला आहे. मुंबई अध्यक्ष निवडीसाठी त्यांचेही मत विचारत घेतले जात असून त्यासाठी खास दिल्लीहून फोन येत आहेत.
मुंबई काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या जागी पूर्ण वेळ अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. मुंबईत काँग्रेसचे 227 ब्लॉक अध्यक्ष असून त्यांना अखिल भारतीय काँग्रेसकडून फोन येण्यास सुरुवात झाली. त्यात त्यांना भावी अध्यक्ष कोण असावा असा प्रश्न विचारला जात आहे. आता पर्यंत महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्ली काँग्रेसपर्यंत पोहच असलेला नेता मुंबईचा अध्यक्ष म्हणून निवडला जात होता. या निवड प्रक्रियेत ब्लॉक अध्यक्षांचे मत फारसे लक्षात घेतले जात नव्हते. मात्र,पहिल्यांदाच या निवड प्रक्रियेत दिल्लीहून ब्लॉक अध्यक्षांचे मत लक्षात घेतले जात आहे.
अध्यक्षपदाच्या स्पर्धेत मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष मनजीतसिंह मनहास,आमदार भाई जगाताप माजी मंत्री सुरेश शेट्टी, नसिम खान,मधू चव्हाण तसेच चरणसिंह सप्रा यांचे नाव स्पर्धेत होते. मात्र काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृहावर फक्त मनहास आणि भाई जगताप यांची भेटी घेतली. त्यामुळे हे दोघेही स्पर्धेत पुढे असल्याचे बोलले जात आहे. त्यातच, मनहास यांनी यापूर्वी मुंबई काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदावर काम केलेले आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे.
अध्यक्ष पदासाठी प्रभारी एच.के.पाटील यांनी आतापर्यंत पाच सहा बैठका घेतल्या आहे. आजी माजी मंत्री आमदार यांच्याशी चर्चा केली. तसेच नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष, माजी मुंबई अध्यक्ष यांचेही मत जाणून घेतले आहे. गेल्या तीन चार महिन्या पासून ही प्रक्रिया सुरु आहे.
----------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Selection process congress mumbai president block presidents get sms call from delhi
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.