चैत्यभूमीवर अवतरले बाबासाहेब

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

घाटकोपर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. ६) चैत्यभूमीवर अलोट गर्दी उसळली होती. दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होतात. पण, आज खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेतले बेंगळूरु ते दादर असा प्रवास करून आलेले ज्येष्ठ नागरिक वेणुगोपाल यांनी. बाबासाहेबांची हुबेहूब वेशभूषा करून आलेल्या वेणुगोपाल यांनी संविधानाची प्रत घेऊन चैत्यभूमीवर उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत छायाचित्रे आणि सेल्फी घेण्यासाठी अनुयायींनी गर्दी केली होती.

वेणुगोपाल यांनी बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ मूलमंत्रानुसार शिक्षणाची कास धरत बीएचईएलपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळेच मी उच्च शिक्षण घेतले, अशी प्रतिक्रिया वेणुगोपाल यांनी दिली. बेंगळुरु ते मुंबई प्रवास वेणुगोपाल यांनी बाबासाहेबांचा वेष परिधान करूनच केला. 

तरुण-तरुणींचे सेल्फी
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. वयोवृद्धांपासून युवक-युवतींपर्यंत सर्वांनीच त्यांच्या चरणी नतमस्तक होत अभिवादन केले. चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्यासह सेल्फी काढण्याचा मोह काही युवतींना आवरता आला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: selfie with babasaheb ambedkar