Shubhada Patwardhan
sakal
मुंबई - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मोठे बंधू आयुर्वेदाचार्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांच्या धाकट्या कन्या आणि आयुर्वेदाच्या ज्येष्ठ अभ्यासिका शुभदा अरविंद पटवर्धन (वय ७८) यांचे आज दि.५ रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने माहीमच्या रहेजा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती अरविंद (माटुंगा), भाऊ अशोक (अमेरिका) आणि बहीण सुनंदा (अमेरिका) असा परिवार आहे.