त्याने धावत्या लोकलमधून वृद्धास ढकललं! वाचा नेमकं काय झालं...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

किरकोळ वादातून एका तरुणाने धावत्या लोकलमधून ढकलल्याने पंडित लडकू पाटील (वय ६०) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित प्रकार तुर्भे रेल्वेस्थानक परिसरात घडला. मयत पंडित यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवी मुंबई : किरकोळ वादातून एका तरुणाने धावत्या लोकलमधून ढकलल्याने पंडित लडकू पाटील (वय ६०) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित प्रकार तुर्भे रेल्वेस्थानक परिसरात घडला. मयत पंडित यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा - ...'हे' घेऊन बाहेर फिरू नका; पोलिस करणार कारवाई!
 
घडलेल्या घटनेनंतर मोहम्मद आरीफ जहरअली शेख (वय २४) वर हत्येचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मयत पंडित पाटील हे कोपरखैरणे रहिवासी आहेत. मोहम्मद डोंगरी येथील रहिवासी आहे. पंडित हे लोकलने कामानिमित्त तुर्भे येथे जात असताना, स्थानक आल्यावर उतरण्यासाठी लोकलच्या दरवाजात येऊन उभे राहिले. याचवेळी मोहम्मद देखील लोकलच्या दरवाजाजवळ उतरण्यासाठी आला. यावेळी लोकलमधून उतरण्यावरून पंडित पाटील आणि मोहम्मद शेख या दोघांमध्ये वाद होऊन त्यांच्यात भांडण झाले. 

हेही वाचा - परदेशी नागरिकाच्या पोटात दीड कोटींचे घबाड

या भांडणाच्या रागातून मोहम्मदने लोकलच्या दारात उभ्या असलेल्या पंडित यांना लाथ मारून धावत्या लोकलमधून तुर्भे रेल्वे स्थानकावर ढकलून दिले. या प्रकारामुळे पंडित गंभीर जखमी झाले. इतर प्रवाशांनी मोहम्मदला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी रेल्वे पोलिसांनी पंडित यांना वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.  नंतर फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, मंगळवारी (ता.१७) त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मोहम्मदवर गुन्हा दाखल करून २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior citizen dies after being pushed by a youth from a running locality