...'हे' घेऊन बाहेर फिरू नका; पोलिस करणार कारवाई!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

मुंबई : बाधित देशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवस घरात एकांतात राहाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यासाठी त्यांच्या हातावर शिक्काही मारला जात आहे. अशा व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी मोबाईल ट्रॅकिंग करण्यात येत असून ते बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना सक्तीने रुग्णालयात भरती केले जाऊ शकते, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - २१ वर्षांनंतर त्याला झाली अटक; केलं होतं कृत्य...

बाधित देशातून मुंबईत आलेले सुमारे ४१३ नागरिक पालिकेच्या निगराणीखाली आहेत. मात्र, काही नागरिक बाहेर फिरत असून घरातच इतरांच्या भेटीगाठी घेत आहेत. घराबाहेर फिरणारा ‘होम कॉरंटाईन’चा प्रवासी लक्षात यावा म्हणून राज्य सरकारने त्यांच्या हातावर शिक्के मारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार असे शिक्केही मारले जात आहेत. मात्र, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या प्रत्येक प्रवाशाचा मोबाईल ट्रॅक केला जाणार आहे. तसेच, पालिकेचे पथकही त्यांचा पाठपुरावा करणार आहे.

हेही वाचा - सरकारी कर्र्मचाऱ्यांना धसका

पोलिस मोबाईल ट्रॅक करणार
पनवेलमध्ये काही संशयित रुग्ण क्रिकेट खेळत असल्याचे आढळले होते; तर मुंबईतही होम कॉरंटाईनमध्ये असलेल्या काही व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्या आहेत. मुंबई महानगर पालिका या व्यक्तीचे मोबाईल क्रमांक पोलिसांना देणार असून पोलिस त्यांचे मोबाईल ट्रॅक करणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taking action on those who move Home quarantine seal in outside area