#HopeOfLife : उतारवयात कर्करोगाचा धोका, महिलांमध्ये प्रमाण सर्वाधिक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 December 2019

मुंबई : आयुष्यात उतारवयापर्यंत सुसह्य निरोगी जीवनाची अपेक्षा सर्वांकडून केली जाते, मात्र ती अपेक्षा आता कर्करोगामुळे फोल ठरत असल्याचे मुंबई कॅन्सर रजिस्ट्रीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. आज वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. वयाच्या पासष्टीनंतर कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याशिवाय महिलांना अनुवांशिकतेतून कर्करोग होण्याची शक्‍यताही सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

धक्कादायक : पुतीन यांच्या जिवाला धोका, ट्रम्प होणार बहिरे; बाबा वन्गाची भारताबाबत भविष्यवाणी काय?

दरवर्षी आढळणाऱ्या एकूण कर्करोगग्रस्त रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे पन्नाशी ओलांडलेले असतात, असे मुंबई कॅन्सर रजिस्ट्रीचे मानद सचिव, कर्करोग रोगतज्ज्ञ डॉ. विनय देशमाने यांनी सांगितले. या वयात रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ लागते, त्यामुळे कर्करोगासारखे आजार होण्याची शक्‍यता अधिक असल्याचे तज्ज्ञ मानतात.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगात घट

महिलांमध्ये प्रामुख्याने स्तनांच्या आणि अंडाशयाच्या कर्करोगांचे प्रमाण वाढत आहे; मात्र गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होत आहे. मुंबईत गर्भाशय मुखाचा कर्करोग झालेल्या महिलांची नोंद २००५ मध्ये ६४३; तर २०१५ मध्ये ४७३ झाली होती. तसेच २००५ मध्ये ३३७ महिलांना; तर २०१५ मध्ये ४२४ महिलांना अंडाशयाचा कर्करोग झाल्याची नोंद आहे.

 धक्कादायक : 'अब तक 21' चा लागला छडा, नागरिकांचा जीव भांड्यात..

वैयक्तिक स्वच्छतेबाबत झालेली जागरूकता आणि शौचालयांचा वापर यामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी झाल्याचे डॉ. देशमाने यांनी सांगितले.

Webtitle : senior citizens has higher chances of cancer here are some facts

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: senior citizens has higher chances of cancer here are some facts