Mumbai : आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह CM एकनाथ शिंदेंचे मुख्य सचिव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPS officer Brijesh Singh

Mumbai : आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह CM एकनाथ शिंदेंचे मुख्य सचिव

मुंबई - आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

अतिरिक्त पोलीस महासंचालक (होमगार्ड) या पदावर कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची अलिकडच्या वर्षांत ही पहिलीच घटना आहे.

1996 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले ब्रिजेश सिंह हे फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यकाळातील सर्वात शक्तिशाली पोलिस अधिकाऱ्यांपैकी एक होते.

त्यानंतर ते माहिती व जनसंपर्क विभागात महासंचालक होते, नोव्हेंबर 2019 मध्ये जेव्हा फडणवीसांची सत्ता गेली आणि उद्धव ठाकरेंनी सत्ता हाती घेतली तेव्हा फडणवीसांच्या जवळच्या अनेक उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात आले त्यात ब्रिजेश सिंह सुद्धा होते.

फडणवीस अडीच वर्षांनंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सत्तेत परतल्यानंतर, देवेन भारती यांची विशेष पोलिस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली,

तर ब्रिजेश सिंग यांना प्रधान सचिव म्हणून पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयामध्ये नियुक्त करण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयात सध्या अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी आणि प्रधान सचिव विकास खारगे यांचा समावेश आहे.