"ज्या गावात भिक मागितली त्याच गावात माझा सत्कार"

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

खर्डी - तब्ब्ल 47 वर्षापूर्वी रेल्वेत भिक मागत असताना माझ्याकडे तिकीट नसल्याने मला एका टीसीने खर्डी स्थानकात उतरवलं होतं. त्यावेळी मी तीन दिवस खर्डीत भिक मागून पोटाची खळगी भरली होती. ही आठवण समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांनी खर्डीत एका कार्यक्रमात बोलून दाखवली. यावेळी बोलताना सिंधुताई म्हणालात, मरणाच्या दारात टाकुन दिलेल्या निष्पाप अनाथांसाठी समाजाने खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. खर्डीत फिरते ज्ञान प्रसारक मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित एकादशी महोत्सवात त्या मार्गदर्शन करत होत्या. 

मोठी बातमी - मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय ! जमावबंदी लागू करण्याचे दिले आदेश...

सिंधुताईंनी आपल्या जिवनातील संघर्षाचा माहितीपट सांगताना, त्यांच्यावर झालेल्या अन्यायातुन स्वतःला सावरत समाजाने मरण्याच्या दारात टाकुन दिलेल्या निष्पाप जिवांना जिवदान देऊन त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी आधार देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. अनाथासाठी चालवत असलेल्या संस्थेला शासनाचं कुठलंही अनुदान अथवा मदत मिळत नसल्याने परवड होते. आजही मला समाजाकडे जाऊन मदतीसाठी झोळी पसरावी लागते अशी खंत देखील सिंधुताई सपकाळ यांनी मार्गदर्शनातुन व्यक्त केली. त्यावेळी मला भुकेची एकादशी भोवली होती मात्र आज एकादशी महोत्सवात माझा सन्मान याच खर्डी गावात होतो याच्यासारखा आनंद नाही, असं सिंधुताई म्हणालात. 

मोठी बातमी - हं... हनीमूनला जाताय, मग 'या' गोष्टी सोबत असू द्या !

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार पांडुरंग बरोरा, शिवसेना ठाणे जिल्हा उप संपर्कप्रमुख संतोष शिंदे, शिवसेना नेते विठ्ठल भेरे, भाजपाचे अशोक इरनक, रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव, हभप एकनाथ महाराज मांजे, समाजसेवक बबन हरणे, पप्पुशेठ मिश्रा, शाम परदेशी, हभप योगेश महाराज घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

senior social worker sindhutai sakpal shares her memory about khardi

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: senior social worker sindhutai sakpal shares her memory about khardi