Sun, July 3, 2022

Sensex Rise : सेन्सेक्स १००० नी वधारला
Published on : 1 February 2022, 6:49 am
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करीत असताना शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाली. आर्थिक पाहणीत सकारात्मक चित्र दाखविल्यानंतर अपेक्षित पडसाद भांडवली बाजारात उमटले. मंगळवारी शेअर बाजारात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स तब्बल १,००० अंकांनी तर निफ्टी २०० अंकांनी वाढला आहे. या तेजीने गुंतवणूकदारांनी दोन लाख कोटींची कमाई केली आहे.
अर्थसंकल्पात स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात रियल्टी शेअरला मोठी मागणी दिसून आली. निफ्टी मंचावर निफ्टी ऑटो वगळता सर्वच क्षेत्रात तेजी आहे. सध्या सेन्सेक्स ६८५ अंकांनी वधारला असून, तो ५८६९९ अंकावर आहे. निफ्टी १८४ अंकांनी वधारला असून तो १७५२४ अंकावर ट्रेड करीत आहे.
Web Title: Sensex Rise Stock Market Big Growth In The Market Nirmala Sitharaman Nifty
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..