डोंबिवली - भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण हे येथील नेतृत्व करतात. राजूनगर तसेच गरिबाचा वाडा प्रभागातील विकासासाठी मी वारंवार निधीची मागणी करतो. मात्र मला विकास कामांसाठी निधी पुरेसा दिला जात नाही. आमच्या बाजूला शिवसेना व मनसेच्या नगरसेवकांचे प्रभाग आहेत तिकडे चारपट निधी भाजप पक्षाकडून दिला जातो.