हॉटेलची वेळ पूर्ववत केल्यास 75 कोटींचे जादा उत्पन्न; हॉटेल संघटनेचा दावा

हॉटेलची वेळ पूर्ववत केल्यास 75 कोटींचे जादा उत्पन्न; हॉटेल संघटनेचा दावा
Updated on

मुंबई ः सध्या हॉटेल व रेस्टोरंट बंद करण्याची रात्री साडेअकराची वेळ दोन तासांनी वाढविल्यास रोज पन्नास ते पंचाहत्तर कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल व पर्यायाने राज्याच्या महसुलातही वाढ होईल, असे हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने दाखवून दिले आहे.  निदान नववर्ष स्वागताच्या निमित्ताने तरी सरकारने आठवडाभर ही सवलत द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. 

कोरोनाच्या फैलावाचा फटका बसलेल्या या क्षेत्राला सावरण्यासाठी असे उपाय योजले तर त्याचा फायदाच होईल. कोरोनापूर्वी रेस्टोरंटना पहाटे दीड वाजेपर्यंत खुले ठेवण्याची मुभा होती, ती वेळ पुन्हा बहाल करावी, असेही संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी सांगितले. 

शहरातील रेस्टॉरंट्समध्ये बहुतकरून रात्री आठ-नऊनंतरच ग्राहक येतात. मात्र लगेच तीन तासांत हॉटेल बंद करावी लागतात. त्यामुळे वेळ वाढवून दिल्यास त्याचा फायदा ग्राहकांनाही होईल. कारण गर्दी विभागली गेल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळता येतील, असे संघटनेचे अध्यक्ष शेरी भाटिया म्हणाले.

केवळ रेस्टॉरंट्सच नव्हे तर मॉल आणि इतर ठिकाणीही अशी कामाची वेळ वाढवली तर राज्यातील महसुलात कमीतकमी 30 टक्के वाढ होऊ शकते. तसेच यामुळे राज्यात आणखी पन्नास हजार लोकांना रोजगार मिळेल, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Seventy five crore get extra income if hotel time is restructure The hotel association claims

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com