esakal | 'कदाचित ही अखेरची शुभसकाळ', कोरोनाग्रस्त डॉक्टरची शेवटची पोस्ट

बोलून बातमी शोधा

sewri tb hospital dr manisha jadhav
'कदाचित ही अखेरची शुभसकाळ', कोरोनाग्रस्त डॉक्टरची शेवटची पोस्ट
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा जाधव यांचे सोमवारी सकाळी कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना संक्रमणाच्या संघर्षात त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.

ही पोस्ट ठरली शेवटची

डॉ जाधव यांनी ' गुडमॉर्निंग, कदाचित ही अखेरची शुभसकाळ असेल. शरीर निघून जाते मात्र आत्मा कायम राहतो अशा आशयाची फेसबुकवर अखेरची पोस्ट शेअर केली होती.

शेवटच्या क्षणापर्यंत कोरोनाशी दिलेल्या लढाईनंतर डॉ. जाधव यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राने हळहळ व्यक्त केली आहे. डॉ. जाधव यांचे सहकारी असलेले शिवडी रुग्णालयातील दिलीप मकवाना यांनी सांगितले, डॉ. जाधव यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर, प्रकृती अस्वास्थ्यांमुळे त्यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने धक्का बसला आहे. 

----------------

(संपादन- पूजा विचारे)

sewri tb hospital dr manisha jadhav succumbed Covid last facebook post