esakal | शहापूर: पुराच्या पाण्यात कुटुंब अडकल्याचं समजताच माजी आमदार दोर घेऊन धावले
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूर: पुराच्या पाण्यात कुटुंब अडकल्याचं समजताच माजी आमदार दोर घेऊन धावले

शहापूर: पुराच्या पाण्यात कुटुंब अडकल्याचं समजताच माजी आमदार दोर घेऊन धावले

sakal_logo
By
नरेश जाधव : सकाळ वृत्तसेवा

शहापूर: मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहापूर (Shahpur) तालुक्यात ठिकठिकाणी हाहाकार उडाला आहे. शहापूर तालुक्याला चहू बाजुंनी पाण्याने वेढले (flood situation) असून अनेक जणांच्या घरात पाणी घुसल्याने नागरिक जीव मुठीत धरून रहात आहेत. (Shahpur former mla pandurang barora save five people from flood water dmp82)

शासन धोकादायक परिस्थिती असलेल्या ठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवत आहे. काही ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते प्रसंगावधान दाखवून मदत करीत आहेत.

हेही वाचा: बदलापूरमध्ये बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याची अफवा

शहापूर मधील परांजपेनगर चेरपोली येथील हायवेलगत असणाऱ्या मैदानावर काल रात्री एका घरात 4 फुटापर्यंत पाणी शिरून घराच्या चारही बाजूला पाण्याचा वेढा पडला होता. येथील 3 लहान मुले व त्यांचे आई वडील पाण्यात घर बुडाल्यामुळे अडकून पडले होते, ही बातमी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना समजताच तात्काळ कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दोराच्या साह्याने त्या शेख कुटुंबाला अगदी सुखरूपपणे बाहेर काढले. सद्यस्थितीत त्यांच्या रहाण्याची सोय करून देण्यात आली आहे.

loading image