Rural Health Crisis: गर्भवतीचा झोळीतून प्रवास; शहापुरात महिनाभरातील तिसरी घटना
Shahapur News: शहापूर तालुक्यातील भवरपाडा येथील गर्भवती महिलेला रस्त्याअभावी झोळीतून १ किमी प्रवास करावा लागला. मोबाईल नेटवर्कच्या अभावामुळे रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने महिलेला खासगी गाडीतून शहापूर उपजिल्हा रुग्णालय गाठावे लागले.
शहापूर : डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेल्या शहापूर तालुक्यातील भवरपाडा येथील गर्भवती महिलेला रुग्णालयात जाण्यासाठी रस्त्याअभावी झोळीतून तब्बल एक किमी प्रवास करावा लागला. तालुक्यातील महिनाभरातील ही अशी तिसरी घटना आहे.