शाहरुखच्या मुलाला एनसीबीने घेतलं ताब्यात; चौकशी सुरु

Aryan khan
Aryan khan

Mumbai drug case : मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापेमारी करत 'एनसीबी'ने शनिवारी रात्री मोठ्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. यामध्ये तीन महिलांसह 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या रेव्ह पार्टीचं बॉलिवूड कनेक्शनही समोर आलं आहे. या रेव्ह पार्टी संदर्भात सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्याचे वृत्त आहे. व्हिआयपी गेस्ट म्हणून तिथं बोलवलं होतं, असी माहिती एनसीबीला आर्यन याने दिल्याचं समोर आलं आहे.

प्रसारमाध्यमांच्या वत्तानुसार, आर्यन खान याची एनसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे. आर्यन याने आपल्याला व्हिआयपी गेस्ट म्हणून बोलवल्याचं सांगितलं, तसेच क्रुझवर येण्यासाठी कुठलीही फी घेतली नसल्याचेही म्हणालाय. चौकशीदरम्यान आर्यन म्हणाला की, 'माझ्या नावाचा वापर करुन क्रुझवर इतरांना बोलवलं गोलं. ड्रग्जसंदर्भात मला कोणतीही माहिती नाही.' शनिवारी रात्री ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या 13 जणांची आज चौकशी होणार आहे. यामध्ये अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. छाप्यादरम्यान सर्व एनसीबीच्या टीमच्या कर्मचाऱ्यांचे फोन बंद करण्यात आले. छापेमारीची कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यांचे फोन बंद होते.

क्रूजवर ड्रग्ज कसं पोहचलं?

क्रूजवर ड्रग्ज कसं आणलं याबाबत माहिती समोर येत आहे. लेन्सच्या डबी, पर्सचे हँडल, शर्टची कॉलर, सॅनिटरी पॅड यामध्ये लपवून ड्रग्ज आतमध्ये नेल्याचं समोर आलं आहे. याशिवाय काहींनी अंडरवीयर च्या शिलाईच्या आत आणि पॅन्ट च्या शिलाईच्या आत लपवून आणले असल्याची माहिती मिळत आहे.

सात तास कारवाई?

एनसीबीला क्रूजवर ड्रग्जबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर एनसीबीचे काही अधिकारी प्रवासी बनून तिथं गेले होते. त्यानंतर समुद्रात क्रूज गेल्यानंतर जेव्हा पार्टी सुरु झाली तेव्हा एनसीबीने कारवाई केली. ही कारवाई तब्बल सात तास सुरु होती. या रेव्ह पार्टीमध्ये दिल्लीतील कंपनी असल्याचं सांगण्यात येत आहे. अटक केलेल्यांमध्ये दिल्लीतील तीन महिलांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com