Shambhuraj Desai : मिलिटरी अपशिंगेत युद्ध स्मारक उभारणार: मंत्री शंभूराज देसाई; मुंबईतील कार्यक्रमात केली घोषणा
सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राज्य शासन देखील राबवत आहे. निवृत्त सैनिक अधिकारी यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या कामाची माहिती नव्या पिढीला व्हावी, यासाठी प्रत्येक तालुकामध्ये माजी सैनिकांचे प्रबोधन पर व्याख्यान आयोजित करण्याचा मानस आहे.
Shambhuraj Desai during the announcement of the war memorial construction at the military ascension site in Mumbai.sakal
मुंबई : अतुलनीय पराक्रम दाखवलेल्या सैनिकांच्या शौर्याची माहिती नव्या पिढीला हवी, यासाठी सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्ध स्मारक (वॉर मेमोरिअल) उभारणार असल्याची घोषणा माजी सैनिक कल्याणमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.