
मुंबई: मंत्री शंभुराज देसाई यांनी आज त्यांच्या कुटुंबासह ‘मेघदूत’ या बंगल्यात गृहप्रवेश केला. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांना हा बंगला शासकीय निवासस्थान म्हणून देण्यात आला. मात्र, ‘मेघदूत’ बंगला केवळ निवासस्थान न राहता देसाई कुटुंबासाठी एक जिव्हाळ्याचे स्थळ ठरले आहे. कारण इथेच शंभुराज देसाई यांचा जन्म झाला होता. त्यानंतर आज ५५ वर्षांनंतर ते सहकुटुंब या बंगल्यात राहायला गेले. या गृहप्रवेशावेळी शंभुराज देसाई यांना अश्रू अनावर झाले होते, तर त्यांच्या मातोश्रीही भावुक झाल्या.