

Vasai Residents Contribute to Rebuild Shantivan in Marathwada
sakal
विरार : सप्टेंबर 2025 मध्ये मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनाथ, एकल अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकरी, ऊसतोड कामगार, आदिवासी, फासेपारधी, भिल्ल, तमाशा कलावंत तसेच लालबत्ती भागात नाईलाजाने काम करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या शांतीवन, आर्वी (जि. बीड) या संस्थेच्या शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले. नदीच्या बांधालगतची जमीन खोलवर वाहून गेली व पिके, फळझाडे पूर्णपणे नष्ट झाली.