esakal | शरद पवार सहकुटुंब मुख्यंमत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Pawar and Thackeray Family

शरद पवार सहकुटुंब मुख्यंमत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर

sakal_logo
By
सुधीर काकडे

राज्यासह देशात काल गणेशोत्सवाला सुरुवात झाली असुन, सर्वत्र मोठ्या आनंदात हा सण साजरा केला जातोय. सर्व सामान्यांसह राज्यातील राजकीय मंडळी, सिनेसृष्टीतील कलाकार आणि सर्वच क्षेत्रातील मंडळी गणेशोत्सव साजरा करत असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह कुटुंब वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, हे देखील उपस्थित होते.

कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर खबरदाराची उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी कलम १४४ (Section 144) लागू केले आहे. मुंबईत सार्वजनिक उत्सव साजरा करताना कोविड-१९ चा फैलाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी (Mumbai police) खबरदारी म्हणून हे पाऊल उचलले आहे. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून हा आदेश लागू करण्यात आला आहे.

गणपतीत मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत गणेश आगमन आणि विसर्जनाच्या भव्य मिरवणुका काढण्यात येतात. पण यंदा त्यावर बंदी आहे. कलम १४४ लागू केल्यामुळे पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या काळात कलम १४४ लागू असणार आहे.

loading image
go to top