राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन, म्हणालेत "मला तुमच्याशी बोलायचा सल्ला मिळाला आहे"

सुमित बागुल
Friday, 30 October 2020

मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

मुंबई : काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. एकीकडे लॉकडाऊनमुळे राज्यातील नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. अशात नागरिकांना वीज कंपन्यांकडून काहीच्या काही वीजबिले आल्याने नागरिकांना मोठा शॉक बसलाय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाढीव वीजबिलांसंदर्भात अनेक आंदोलने केलीत, तरीही सरकारकडून काहीही निर्णय होत नाहीये. म्हणून काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं असं राज ठाकरेंनी राज्यपालांना सांगितलं होतं. त्यावर राज्यपालांनी राज ठाकरे यांना शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांशी फोनवरून चर्चा केलेली आहे. 

महत्त्वाची बातमी लॉकडाऊनमध्ये आईचा पगार झाला बंद, १४ वर्षीय लहानगा चहा विकून चालवतोय स्वतःचं घर

शरद पवारांनी सांगितलं काय झालं बोलणं 

मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

स्वतः शरद पवारांनी देखील याबाबत खुलासा केलाय. याबाबत बोलताना शरद पवार म्हणालेत, काल राज ठाकरेंचा फोन आलेला, त्यांनी सांगितलं की त्यांना असं मार्गदर्शन केलेलं आहे, मी ठीक आहे म्हंटल, काही हरकत नाही.

राज ठाकरे हे शरद पवारांना भेटणार आहेत का, असं देखील पवारांना विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार म्हणालेत, असं काही ठरलेलं नाही. मी बाहेरगावी जात आहे, त्यामुळे मी तीन चार दिवस इथे नसेन, फक्त त्यांनी मला सांगितलं की मला तुमच्याशी बोलण्याचा सल्ला दिला गेला आहे. 

sharad pawar on conversation with raj thackeray after meet up with bhagatsinh koshyari


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar on conversation with raj thackeray after meet up with bhagatsinh koshyari