

Sharad Pawar Drought Inspection Tour Maharashtra From September 28 Farmers Meeting Crop Loss And Relief Issues
sakal
मुंबई: दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार २८ सप्टेंबरपासून दौऱ्यावर जाणार आहेत. शेतांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार आहेत.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये, भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना २५ हजार रुपयांची मदत, तातडीने कर्जमाफी व नवीन पीककर्जाची उपलब्धता करण्याची मागणी त्यांनी केली आहे.