esakal | "रावसाहेब दानवे यांना ज्योतिष शास्त्र माहिती आहे, हे आम्हाला माहित नव्हतं" - शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

"रावसाहेब दानवे यांना ज्योतिष शास्त्र माहिती आहे, हे आम्हाला माहित नव्हतं" - शरद पवार

जयसिंग गायकवाड पुन्हा राष्ट्रवादीत आल्याचा आनंद असल्याचंही शरद पवार म्हणालेत. 

"रावसाहेब दानवे यांना ज्योतिष शास्त्र माहिती आहे, हे आम्हाला माहित नव्हतं" - शरद पवार

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्यालयात बीडचे भाजपचे माजी खासदार जयसिंग आयकवाड यांचा राष्ट्वादीत पक्षप्रवेश झाला. स्वतः राष्ट्वादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना जयसिंग गायकवाड यांनी भाजप पक्षावर आणि देवेंद्र फडणवीसांवर कडाडून टीका केली. "खुखार आतंकवाद्यांनी भाजपचा ताबा घेतला आहे", अशी जहरी टीका जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी पक्षप्रवेशावेळी केली आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी स्वतः शरद पवारांनी देखील उपस्थितांचे संबोधन केले. यावेळी देशाच्या राज्याच्या सध्याच्या परिस्थितीवर शरद पवारांनी भाष्य केलंय. 

महत्त्वाची बातमी : "आता नको वादावादी, आता फक्त राष्ट्रवादी" म्हणत भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीत !

"आज शिवसेनेच्या प्रतिनिधींसोबत काय झालं, यावरून सत्तेचं वापर विरोधकांवर कशा प्रकारे केला जातोय हे दिसून आलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळतो आहे. त्यामुळे विरोधकांचं नैराश्य वाढलं आहे. म्हणूनच महाराष्ट्रात हे सगळं पाहायला मिळत आहे. रावसाहेब दानवे यांना मी राजकारणी समजत होतो, पण त्यांना ज्योतिष शास्त्र माहीत आहे हे मात्र माहीत नव्हतं. महाराष्ट्रातून सत्ता गेल्याची अस्वस्थता पाहायला मिळतेय. माणसाने आशा कायम ठेवावी, मात्र मी पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हंटले की लोक लक्ष देतात असं नाही, असं विधान शरद पवार यांनी केलंय. 

महत्त्वाची बातमी : भोंगळ कारभार पाहा; नागरिकांना गेलीत दुप्पट तिप्पट बिलं, पालिकेच्या कंत्राटदाराला 'उणे' वीज बिल

दरम्यान, जयसिंग गायकवाड पुन्हा राष्ट्रवादीत आल्याचा आनंद असल्याचंही शरद पवार म्हणालेत. 

sharad pawar on ED action taken on sarnaik and overall situation in india and state

loading image
go to top