"केंद्राची भूमिका अनुकूल दिसत नाही, सरकारने अन्नदात्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये" : शरद पवार

"केंद्राची भूमिका अनुकूल दिसत नाही, सरकारने अन्नदात्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये" : शरद पवार

मुंबई : दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज शेतकरी आंदोलनाचा पंधरावा दिवस आहे. दररोज अधिकाधिक शेतकरी आंदोलनात सहभागी होतायत. याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणालेत की, "शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये मुख्यतः तीन बिलांच्या संबंधीच्या मागण्या आहेत. ही तीनही बिलं संसदेत जेंव्हा आली तेंव्हा सर्वांकडून सांगण्यात आलं की घाईघाईने महत्त्वाचे तीन कायदे, जवळपास चर्चा न करता मंजूर करणं हे आज जरी तुम्हाला शक्य असलं तरीही उद्या त्याबाबत शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही घाईने असं करू नका. मात्र विरोधकांची ती सूचना अजिबात मंजूर केली गेली नाही. तीनही कायदे अगदी पंधरा ते वीस मिनिटात मंजूर केले गेले.आज त्यासंबंधी टोकाची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याबाबत फेरविचार करण्याआधी हे कायदे मागे घ्या आणि नंतर तुम्ही चर्चेला बसून काही मार्ग काढायचा असेल तर आम्ही तयार आहोत."

पुढे बोलताना शरद पवार म्हणालेत की, याबाबत केंद्राची भूमिका सध्यातरी अनुकूल दिसत नाही. त्यामुळे हा संघर्ष आणखीन काही दिवस चालेल अशी चिन्ह आज पाहायला मिळतायत. माझ्याकडे जी माहिती आलीये त्यामध्ये सातशे ट्रॅक्टर भरून शेतीशी निगडित नागरिक मोर्चासाठी पुढे आहेत. याबाबत वेळीच निर्णय घेतला नाही तर हे अन्य ठिकाणी देखील हे आंदोलन पसररण्याची शक्यता आहे. आमची भारत सरकारला विनंती आणि सूचना आहे की, हा शेतकरी आणि देशाचा अन्नदाता आहे. आता अन्नदात्याच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये" 

sharad pawar on farmers protest first cancel all three bills and then will sit for conversation

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com