'निसर्ग'बाधित नागरिकांना दिलासा देण्यासाठी शरद पवारांनी केल्यात 'या' सूचना...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाच्या दुहेरी संकटात रायगडमधील नागरिक सापडले असल्याने सरकारने येथील नागरिकांना दिलासा देण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

रायगड, अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मान्सून काही दिवसातच सुरू होणार असल्याने लवकरात लवकर घरे बांधण्यासाठी मदत करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितले आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दोन दिवस रायगड, रत्नागिरीमध्ये दौऱ्यावर आहेत. माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन येथील पाहणी केल्यानंतर श्रीवर्धन येथील आढावा बैठकीत बोलत होते.

मोठी बातमी - कोरोनासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथ, 'या' आहेत मार्गदर्शक सूचना...

कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाच्या दुहेरी संकटात रायगडमधील नागरिक सापडले असल्याने सरकारने येथील नागरिकांना दिलासा देण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

घर दुरुस्तीसाठी रोख रक्कम द्या, निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टी लगतच्या बागायतदार, मच्छीमार यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर प्रशासनाने पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, कोरोना ग्रस्तांना अन्नधान्याची जी मदत केली होती ती मदत चक्रीवादळात भिजून गेली आहे. शासनाने चक्रीवादळातील नागरिकांनाही तत्काळ मदत म्हणून रॉकेल यासोबत तांदुळ, गहु, डाळीचे वाटप करावेत अशा सुचना शरद पवार यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

Inside Story : तुमच्या जिल्ह्याचं नावं कसं ठरलं, जाणून घ्याच...

मंगळवारी सकाळी त्यांनी माणगाव येथुन पहाणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर म्हसळा, दिवेआगर, शेखाडी येथील नुकसानीची पहाणी केली. नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या. यावेळी त्यांच्या सोबत पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर , उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन अमित शेडगे आदींची उपस्थिती होते.

sharad pawar gave these instructions to concerned authorities after visiting raigad   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar gave these instructions to concerned authorities after visiting raigad