esakal | ..म्हणून शरद पवार आहेत महाराष्ट्राचे 'गाॅडफादर'
sakal

बोलून बातमी शोधा

..म्हणून शरद पवार आहेत महाराष्ट्राचे 'गाॅडफादर'
  • काका मला वाचवा...!
  • राजकारणातील पुतण्यांची काकांवर भिस्त
  • कुणा कुणाला तारणार काका?

..म्हणून शरद पवार आहेत महाराष्ट्राचे 'गाॅडफादर'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राज्यातला सत्तासंघर्ष शिगेला पोहचलाय. अशात सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या एकाच व्यक्तीवर. राज्यातलं सर्वात मोठं नेतृत्व शरद पवार यांच्यावर. राजकारणातील या 'बाप' नेतृत्त्वावरच पुतण्यांची सारी भिस्त अवलंबून आहे. पक्ष आणि विचारधारा वेगवेगळी असली तरी पवारांशी सख्यत्व कुणाला नकोय. म्हणूनच तीन पुतण्यांनी काकांशी प्रचंड जवळीक साधलीय. 

राज ठाकरे

राजकीयदृष्ट्या डबघाईला आलेलं मनसेचं नेतृत्व ईडीच्या चौकशीमुळे संकटात आहे. अशावेळी राज ठाकरेंचे एकच मार्गदर्शक काका शरद पवार.

उद्धव ठाकरे

सध्याच्या घडीला राजकीयदृष्ट्या अडचणीत. भाजपशी घेतलेला काडीमोड आणि बाळासाहेबांना दिलेला शब्द यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण कोण करणार? तर तेही काकाच...शरद पवार!

अजित पवार

सिंचन घोटाळ्याचे आरोप आणि काही वक्तव्यांमुळे राजकीय पटलावर काही काळासाठी  बॅकफुटवर गेलेले. पण मुख्यमंत्री व्हायचं असेल तर अजित पवारांना कोण लागणार काकाच.

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो :

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो. काका-पुतण्यांमधील नात्यानं ते दाखवून दिलंय. आता प्रत्येक पुतण्याला राजकारणात स्वत:चा आब दाखवून द्यायचाय. पण त्यांच्या नाड्या सर्वस्वी काकांच्याच हातात आहेत. त्यामुळे काका मला वाचवा अशी आर्जव करणाऱ्या पुतण्यांना पवार काका कसे तारतात, यावरच उभ्या महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित झालंय.

काकांमुळे या पुतण्यांचं राजकीय भवितव्य उंचावेलही पण काकांएव्हढी अचाट बुद्धिमत्ता चाणाक्यनिती कुठून येणार..हाही प्रश्न आहेच.

Web Title : sharad pawar god father of maharashtras politics 

loading image