esakal | मोठी बातमी - पुन्हा शरद पवार उद्धव ठाकरेंची घेणार भेट, चर्चेस कारण की...
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी - पुन्हा शरद पवार उद्धव ठाकरेंची घेणार भेट, चर्चेस कारण की...

गृहविभागाने मुंबईतील 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर आता हा वाद चिघळल्याचे संकेत आहेत.

मोठी बातमी - पुन्हा शरद पवार उद्धव ठाकरेंची घेणार भेट, चर्चेस कारण की...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - गृहविभागाने मुंबईतील 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर आता हा वाद चिघळल्याचे संकेत आहेत. दोनच दिवसांपुर्वी उध्दव ठाकरे यांनी या बदल्यांना स्थगिती दिली होती. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 6 वाजता ही भेट होणार असून सत्तेतला समन्वय राखण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे पुन्हा भेट होत असल्याने राजकीय नेत्यांमधे अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. मागच्या आठवडाभरात शरद पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी जात असून मंत्रीमंडळातील असमन्वयाचे चित्र पुन्हा गडद होत असल्याचे मानले जाते.

मोठी बातमी - कोरोनाच्या काळात कल्याण डोंबिवलीतून आली आनंदाची बातमी...

मागील आठवड्यात शरद पवार यांनी ठाकरे स्मारकात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मुंबईत २ किलोमीटर परिघातच प्रवास मुभा आणि MMR भागांमध्ये म्हणजेच ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये जारी करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली होती.

पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नव्हता. याबाबत लोक प्रतिनिधींशी बोलून हा निर्णय घेतला गेला पाहिजे अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका होती. शरद पवारांमार्फत हा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आला होता.  या बैठकीनंतर मुंबईतील २ किलोमीटरपर्यंतच प्रवासास मुभा देण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. 

sharad pawar to meet cm uddhav thackeray along with anil deshmukh read full news

loading image