BIG NEWS - मुंबईत पुन्हा राजकीय खलबतं, संध्याकाळी शरद पवार पुन्हा भेटणार मुख्यमंत्र्यांना?

सुमित बागुल
शुक्रवार, 10 जुलै 2020

आज संध्याकाळी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होणार ?  

मुंबई : मुंबई गेल्या काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. यामध्ये आता आणखी भर पडताना पाहायला मिळतेय. याला कारण म्हणजे आज संध्याकाळी पुन्हा एकदा होणारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेट. आज संध्याकाळी पुन्हा एकदा दोन्ही नेते भेटणार असल्याची शक्यता आहे.  

आठवडा भरतील अशरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही दुसरी भेट असेल. मागील भेटी या मुख्यत्त्वे मुंबईतील दोन किलोमीटर प्रवास मुभा, मुंबईतील पोलिस उपायुक्तांच्या बदल्या, मुंबई उपनगरांमधील कडकडीत लॉकडाऊन आणि सोबतच पारनेरमधील शिवसैनिकांनी केलेला राष्ट्रवादी पक्षातील प्रवेश, यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात भेट झाली होती.   

मोठी बातमी - फुटपाथवर झोपलेला 'तो' तरुण कोविड हॉस्पिटलमधून पळाला होतो, पुन्हा दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा

दरम्यान, आज संध्याकाळी शरद पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार अशी शक्यता आहे. मुंबईतील २ किलोमीटर प्रवास मुभा आणि पारनेरचा प्रश्न आता मार्गी निघालाय. आता यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत पुढील काळात समन्वय कसा राहील, येत्या काळात लॉकडाऊन संदर्भात कशी पावलं उचलली गेली पाहिजेत, IPS पोलिसांच्या बदल्या, या सर्व प्रश्नांवर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात आजच्या बैठकीत काय चर्चा होते आणि त्याचा आगामी काळातील राजकारणावर याचा कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

sharad pawar to meet cm uddhav thackeray second meeting in a week


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar to meet cm uddhav thackeray second meeting in a week