२०१४ ला भाजपला पाठिंबा का?, शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट

२०१४ ला भाजपला पाठिंबा का?, शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई- सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय. या मुलाखतीत राज्यातील राजकारण आणि महाविकास आघाडीच्या भवितव्यावर भाष्य केले.  यादरम्यान शरद पवारांनी २०१४ साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला, याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०१४मध्ये पवारांनी कोणकोणत्या राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला, याचा खुलासाही त्यांनी या मुलाखतीत केला आहे. याचवेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाची त्यांच्या खास शैलीत खिल्लीही उडवली. 

२०१४ साली राष्ट्रवादीने  भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सरकार स्थापन झाले होते. पण त्यावेळी, 'माझी पहिल्यापासूनची मनापासून इच्छा होती की, शिवसेनेने भाजपबरोबर जाऊ नये. ते जातील असे ज्यावेळी दिसले तेव्हा मी जाणीवपूर्वक स्टेटमेंट केले की, आम्ही तुम्हाला म्हणजे भाजपला बाहेरून पाठिंबा देतो. हेतू हा होता की, शिवसेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी' अशी कबुली खुद्द शरद पवार यांनी दिली आहे.

शिवसेना-भाजपमध्ये अंतर वाढावं हाच आमचा प्रयत्न होता. पण जेव्हा शिवसेना भाजच्या सरकारमध्ये सामिल होणार असं वाटलं तेव्हा भाजपला पाठिंबा द्यायला तयार आहोत, असं स्टेटमेंट मी जाणीवपूर्वक दिलं, गौप्यस्फोट त्यांनी केला. . २०१४ मध्ये राज्यात भाजपचं सरकार आलं होतं. आता सहा वर्षानंतर पवारांनी ही कबुली दिली. 

२०१४ साली तुम्हाला भाजपबरोबर सरकार स्थापन करायचं होतं. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी तशी तुमची चर्चाही सुरू होती, असा देवेंद्र फडणवीस यांनी ठाम दावा केला. त्यावर तुमचं काय उत्तर आहे? असा सवाल संजय राऊत यांनी पवारांना केला. त्यावर पवार आधी मिश्किल हसले आणि त्यानंतर त्यांनी एकावर एक धक्कादायक विधानं करायला सुरुवात केली. फडणवीस जे म्हणाले ते माझ्याही वाचनात आलं आहे. पण गंमत अशी आहे की त्यावेळी ते कुठे होते माहीत नाही? भाजपच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचं काय स्थान होतं हे सुद्धा मला माहीत नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना हे माहीत झाले. त्यापूर्वी विरोधी पक्षातील एक जागरूक आमदार म्हणून त्यांचा लौकीक होता. त्यांना भाजपमधील देशाच्या आणि राज्याच्या नेतृत्वात बसून निर्णय घेण्याचा अधिकार होता, असं मला माहीत नाही, असंही पवार म्हणालेत.

sharad pawar reveal 2014 election bjp support sanjay raut interview

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com