सणासुदीच्या दिवसांत रायगड जिल्ह्याचा धोका वाढणार; मोठी माहिती आली समोर...

महेंद्र दुसार - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

  • रायगडमध्ये समुह संसर्गाचा धोका 
  • सणासुदीच्या दिवसात संसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता; ठोस उपाययोजना आखण्याची होतेय मागणी

 

अलिबाग:  रायगड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या साडेसात हजाराहुन अधिक झालेली आहे. मागील चार दिवसात रुग्ण वाढीची सरासरी तिनशेहून अधिक आहे. रविवारी एकाच दिवशी 432 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत, यातील 168 रुग्णांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. या आकडेवारीवरुन ट्रॅव्हल हिस्ट्री मागे पडत असून जिल्ह्यात समुह संसर्गाचा धोका अधिकाधीक वाढत चालला आहे. 

कठोर नियम, निर्जंतुकिकरणाचा खर्च, इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे कॅब चालकांवर उपासमारीची वेळ...

नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, या आजुबाजुच्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असताना उरण, पनवेल वगळता जिल्ह्याच्या उर्वरीत भागात शिथीलता देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 212 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 3 हजार 260 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. इतर जिल्ह्यांच्या प्रमाणात ही संख्यावाढ गंभीर स्वरुपाची आहे. यामुळे कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमधून लॉकडाऊनची मागणी होत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे कारखानदारीवर परिणाम होईल, असे कारण देत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लॉकडाऊन पुन्हा लावण्यास नकार दिला.

सावधान ! तज्ज्ञ म्हणतायत कोरोना केवळ फुफ्फुसांवर नाही तर 'या'ही अवयवांवर करतोय हल्ला...

परिणामस्वरुप सुरुवातीला मर्यादीत असलेल्या कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. निसर्ग चक्रीवादळातील मदतकार्यात हा वेग वाढतच गेला, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकही कोरोनाच्या कचाट्यात सापडत गेले. मुंबई लगतचा जिल्हा असल्याने मुंबईत कामानिमित्ताने जाणाऱ्या नोकरदार वर्गाच्या माध्यमातून पनवेल महानगर पालिका, उरण तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट ठरला होते. त्यानंतर कर्जत, अलिबाग, महाड, माणगाव या तालुक्यांमध्येही रुग्णांची संख्या वाढतच गेली. या तालुक्यांमधील आदिवासी पाड्यातील नागरिकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून येत आहे, ज्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री कोणतीही नाही. कोरोनाबद्दलचे संभ्रम आणि क्वॉरंटाईन करण्याच्या भितीने निकट सहवासात येवूनही अनेकजण माहिती दिली जात नाही. परिणामी, त्यांच्यामुळे संपर्कातील इतर लोकांनाही बाधा होत आहे. शिवाय, कोरोनाग्रस्तही ट्रॅव्हल हिस्ट्री लपवत असल्याने प्रशासनापुढे निकट सहवासित शोधणे अडचणीचे झाले आहे. संशयीत रुग्ण आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांकडे माहिती देत नाहीत. त्यामुळे कोरोनाची लक्षणे गंभीर होईपर्यंत रुग्ण स्वतःहुन पुढे येत नाही. सद्या सणावारीचे दिवस असल्याने यासाठी लोक समुहाने येत असतात, यामधूनही संसर्गाचा धोका वाढला आहे. 

जिल्ह्यातील सद्याचे कोरोनाबाधीत
पनवेल मनपा - 1423, 
पनवेल ग्रामीण - 417, 
उरण - 182, 
खालापूर - 250, 
कर्जत - 97, 
पेण - 304, 
अलिबाग - 205, 
मुरुड - 48, 
माणगाव - 70, 
तळा - 4, 
रोहा - 98, 
श्रीवर्धन - 48, 
म्हसळा - 58, 
महाड - 43, 
पोलादपूर - 13 
------
एकूण 3 हजार 260

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The corona of Raigad district will increase during the festive season;