महाराष्ट्रात सरकार विरुद्ध राज्यपाल असा नवा संघर्ष सुरू होण्याचे संकेत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 एप्रिल 2020

राज्यात दोन सत्ताकेंद्र होणार नाहीत याची काळजी घ्यावी...

मुंबई : राज्यभरात कोरोना चे संकट वाढत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे स्वतंत्रपणे प्रशासनाच्या बैठका घेऊन आदेश देत असल्याबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये पवार यांनी राज्यपालांच्या या भूमिकेबाबत तक्रारच व्यक्त  केली. आपत्तीच्या या  काळात राज्यांमधील परिस्थितीचा  आढावा घेण्याचे अधिकार राज्यपालांना जरूर आहेत परंतु एका बाजूला राज्य सरकार सक्षम पणे प्रशासनासोबत आपत्तीशी सामना करत असताना राज्यपालांनी स्वतंत्रपणे प्रशासनाला आदेश देणे हे दोन सत्ता केंद्र निर्माण करण्या सारखे आहे. अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.  

मोठी बातमी -  CM उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला 'आज' केलेल्या ३ मोठ्या आणि महत्त्वाच्या सूचना

राज्यपालांच्या अशा भूमिकेमुळे राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री यांच्यात सुरू असलेल्या समन्वयात कुठलाही खंड पडता कामा नये किंवा बाधा येऊ नये याची काळजी घ्यायला हवी असे पवार यांनी सूचित केले.

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जिल्ह्यातील प्रशासनासोबत आणि मुख्य सचिवांसोबत कोरोना या संदर्भात आढावा बैठका घेत आहेत. राज्य सरकारला विश्‍वासात न घेता प्रशासनाला परस्पर सूचना देखील ते करत आहेत. यावरून सरकार विरुद्ध राज्यपाल असा नवा संघर्ष सुरू होण्याचे संकेत आहेत. अशावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करून याबाबत लक्ष घालावे असे सांगितले आहे.

मोठी बातमी -  विवीध ब्लड ग्रुप्स आणि कोणत्या ब्लड ग्रुपला आहे कोरोनाचा जास्त धोका, जाणून घ्या...

याबद्दलची माहिती शरद पवार यांनी ट्विटर वरून देताना राज्यातील आणि इतर राज्यातील राज्यपाल आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेत असून प्रशासनाला परस्पर सूचना करत असल्याचे निदर्शनास येते असे म्हटले आहे. असा अधिकार राज्यपालांना असला तरी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्यात असमन्वय होणार नाही आणि राज्यात दोन सत्ताकेंद्रे कार्यरत होणार नाहीत याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे अशी सूचना शरद पवार यांनी पंतप्रधानांना  केली आहे. 

sharad pawar speaks to PM modi about governor bhagatsingh koshyari


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar speaks to PM modi about governor bhagatsingh koshyari