विवीध ब्लड ग्रुप्स आणि कोणत्या ब्लड ग्रुपला आहे कोरोनाचा जास्त धोका, जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

चीनच्या वुहान शहरात तब्बल २००० पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांचा ब्लड ग्रुप तपासण्यात आला. त्यात सर्वाधिक रुग्ण हे 'A' ब्लड ग्रुपचे होते.

मुंबई: संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. मात्र तुम्हाला कोरोनाचा किती धोका आहे किंवा नाही हे तुम्हाला तुमच्या ब्लड ग्रुपवरून समजू शकणार आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जगात झालेल्या कोरोनाच्या सर्वेक्षणानुसार काही ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात जास्त धोका आहे, तर काही ब्लड ग्रुपच्या लोकांना कोरोनाचा धोका नाही असे तर्क समोर येतायत. मात्र असं असलं तरी सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना झाल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी तसंच कुठल्या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना सांभाळून राहण्याची गरज आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मोठी बातमी - रोहित पवार यांनी ट्विटरवरून सुनावलं, म्हणालेत "काम करताना किंचाळण्याची गरज नसते..."

'A ' ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका:

चीनच्या वुहान शहरात तब्बल २००० पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांचा ब्लड ग्रुप तपासण्यात आला. त्यात सर्वाधिक रुग्ण हे 'A' ब्लड ग्रुपचे होते. त्यामुळे A ब्लड ग्रुपच्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे या लोकांनी स्वतःची जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

तसंच ब्लड ग्रुप B,O आणि AB असलेल्या लोकांना त्या तुलनेत कमी धोका आहे. मात्र सगळ्याचा ब्लड ग्रुपच्या लोकानीं मास्क लावणं आणि सॅनेटाईझरचा वापर करणं महत्वाचं आहे.

या गोष्टींपासून राहा सावध:

  • कोरोना व्हायरसचे भरपूर प्रकार आहेत त्यामुळे या सर्व प्रकारांपासून सावध राहण्याची गरज आहे.
  • कोरोना व्हायरसचा परिणाम तरुणांवरही होतो. मात्र त्यांना कुठलेही लक्षणं दिसत नाहीत त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
  • कोरोनाबाधित रुग्णांच्या शरीरात हा व्हायरस तब्बल ३७ दिवस जिवंत राहू शकतो.
  • त्यामुळे आपल्या सर्वांनाच काळजी घेण्याची गरज आहे.

मोठी बातमी -  मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पोस्ट, ठाण्यातील अभियंत्याला बेदम मारहाण...

हे औषध येतय कामी:

जगभरात वैज्ञानिक कोरोनावर औषध शोधत आहेत मात्र त्यांना अजूनतरी कुठलंही यश आला नाहीये. मात्र भारतात मलेरियावर फायदेशीर ठरणारं हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन कोरोनाचं संक्रमण होण्यापासून बचाव करू शकतं. त्यामुळे भारतात आरोग्य कर्मचाऱ्यांना हे औषध दिलं जातंय. 

कोरोनाचे सर्वात पहिली लक्षणं सर्दी, खोकला, ताप आहेत त्यामुळे जर तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास झाला तर लगेच डोकोरान्न दाखवा आणि स्वतःचा कोरोनापासून बचाव करा.

various blood groups and which blood group has bigger threat of getting corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: various blood groups and which blood group has bigger threat of getting corona