esakal | कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी ठरवलं तर स्मारकाचं काम दोन वर्षात शक्य - शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी ठरवलं तर स्मारकाचं काम दोन वर्षात शक्य - शरद पवार

कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी ठरवलं तर स्मारकाचं काम दोन वर्षात शक्य - शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इंदू मिलमध्ये जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केलीये. यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. अल्पसंखयांक मंत्री नवाब मलिक आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  हे देखील शरद पवार यांच्यासोबत उपस्थित होते. 

या आधीच अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत २०२२ पर्यंत  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम पूर्ण होणार असल्याचं बोलून दाखवलं होतं.  अजित पवार यांनी त्याठिकाणची पाहणी करत काही सूचना  देखील दिल्या होत्या. या सूचना, त्यांची पूर्तता आणि त्यामध्ये अधिक काय करता येईल, यासाठी शरद पवार यांनी आज आज इंदू मिलमध्ये येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली.

मोठी बातमी -  मला 'नाईट लाईफ' हे शब्दच आवडत नाही - उद्धव ठाकरे

शरद पवार यांनी सर्व कामाचा आढावा घेतला, याठिकाणी स्मारकाची  एक प्रतिकृती देखील बनवण्यात आली आहे. ती देखील शरद पवारांनी यांनी पहिली, त्याचसोबत लेझर लाईटच्या माध्यमातून कुठे काय होणार आहे हे देखील जाणून घेतलं. 

शरद पवारांनी मांडलेलं महत्त्वाचे मुद्दे : 

 • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम २५ टक्के झालंय, अजूनही ७५ टक्के काम बाकी आहे. 
 • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे 
 • या स्मारकाचं काम करणारी संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था आहे.  
 • कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी मनापासून ठरवलं तर हे काम दोन वर्षात पूर्ण होऊ शकतं 

भीषण - दिल्ली हैद्राबादनंतर मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार.. 

 • कुठल्याही परवानग्या शिल्लक नसतील तर स्मारकाचं काम दोन वर्षात काम करणे अशक्य नाही
 • कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी आव्हान स्वीकारून काम करायला हवं 
 • जगभरातील बौद्ध समाजाला या स्मारकाचं आकर्षण राहील, देशभरातील प्रत्येक नागरिक याठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. 
 • या स्मारकामुळे चैत्य भूमी आणि बाबासाहेब आंबेडकर स्मारक असा संगम पाहायला मिळेल. 
 • आज या ठिकामी मी कोणत्याही कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत
 • आपल्या देशात अशा गोष्टी आल्यात की अनेक प्रकारच्या भावना व्यक्त केल्या जाणत. 
 • आपल्या देशात स्वात्यंत्त्र्य आहे. भारतात नागरिक मुक्तपणे बोलू शकतात. त्यामुळे पटेल ते घ्यायचं असंही शरद पवार म्हणालेत. 

sharad pawar visits indu mill compound and reviewed monument of dr baasaheb thackeray

loading image