esakal | राजकीय भूकंपातही शरद पवारांचं कुटुंब अभेद्य !
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय भूकंपातही शरद पवारांचं कुटुंब अभेद्य !
  • राजकारणामुळे ठाकरे कुटुंबात उभी फूट!
  • राजकारणामुळे मुंडे कुटुंबाला तडा!
  • भल्याभल्यांची कुटुंब राजकारणाने मोडली!

राजकीय भूकंपातही शरद पवारांचं कुटुंब अभेद्य !

sakal_logo
By
सिद्धेश सावंत

'राजकारणं वाईट', असं म्हणणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही.  त्यातच एकाच कुटुंबातले दोन सदस्य राजकारणात असतील, तर त्यातून आणखीनच कलह निर्माण होतो. हे आम्ही नाही तर इतिहासच सांगतो. पण सगळ्या राजकीय भूकंपात एक गोष्ट ठळकपणे जाणवली. ती म्हणजे महाप्रलयकारी राजकीय भूकंपातही शरद पवारांचं कुटुंब अभेद्य राहिलंय. 
 

राजकीय भूकंपातही पवारांचं कुटुंब अभेद्य!

महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्त्वाचं कुटुंब म्हणून पवारांकडे पाहिलं जातं. या कुटुंबात उभी फूट पडली, असं चित्र निर्माण झालं. कारण होतं अजित पवारांचं बंड सुप्रियाताईंचे डोळे पाणावले, पक्ष आणि कुटुंबात विभागणी झाली, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आपल्या थोरल्या बंधूंच्या घरी गेले. फोनवरुन ते कुणाशीतरी संपर्कात राहिले. मुलगा पार्थही सोबत होता. मात्र त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार अजित पवारांचे परतीचे मार्ग बंद होतील, असं काहीही बोलले नाहीत! या आधीदेखील राजकारण आणि कुटुंब दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं सांगितलंय.  इतकी शांत आणि संयमी प्रतिक्रिया येणं, हे शरद पवारांनाच जमू शकतं. कॅप्टन कूल धोनीसारखे शरद पवारही राजकीय भूकंपात कूल होते. 


कसं आहे पवार कुटुंब?

शरद पवार हे गोंविद पवार आणि शारदा पवार यांचे पूत्र. गोविंद आणि शारदा पवार यांना एकूण 7 मुलं तर 4 मुली. 

शरद पवारांना सुप्रिया सुळे ही एकुलती एक मुलगी. तर अजित पवार हा शरद पवारांचा पुतण्या.

सामाजिक कार्याचा वारसा शरद पवारांना त्यांच्या आई शारदाबाईंनी दिला. पवार कुटुंबाच्या पहिल्या पिढीत थोरले बंधू शेतकरी कामगार पक्षात होते. मात्र पवार नेहरुंकडे आकर्षित झाले. आणि काँग्रेसचा मार्ग स्विकारला. मात्र त्यांच्या या मार्गाला घरातून कधीच विरोध झाला नाही. दोन विरुद्ध विचार संवादाच्या रुपाने एकत्र कुटुंब म्हणून पुढे आले.

पवारांच्या दुसऱ्या पिढीत अजित पवारांसोबत सुप्रियाही राजकारणात आल्या. तिथंही पवारांनी सुप्रिया राजधानीत तर अजित राज्यात अशी राजकीय वाटणी केली.

तिसऱ्या पिढीतला रोहित हा आप्पासाहेबांचा नातू.  म्हणजेच अजित पवारांचा पुतण्या. तर अजित पवारांना पार्थ आणि जय ही दोन मुलं.

पार्थ लोकसभा निवडणुकीत पराभूत झाला, तर रोहितने विधानसभा निवडणुकीत विजयी गुलाल उधळला. निवडणुकीत काहीही होवो, प्रत्येक सणावाराला पवार कुटुंबीय एकत्र येतात. मग दिवाळी असो की दसरा!  मतदानालाही पवार फॅमिली सोबतच असते!

पण राजकीय भूकंप आला. या भूकंपाच्या 78 तासांच पवार कुटुबांने धीर सोडला नाही. कोणतीही हातघाई न करता, अद्वातद्वा विधानं न करता, अजित पवारांची मनधरणी केली.

आजही पवारांच्या घरात वडिलधाऱ्यांचाच शब्द अंतिम असतो, हे अजित पवारांच्या आजच्या कृत्याने सिद्ध केलं आणि पवार कुटुंब अभेद्य आहे, हे सगळ्यांना ठासून सांगितलं.

Webtitle : sharad pawars family is united even after political tremors in maharashtra

loading image