Kalyan Crime: शेअर मार्केटच्या नावाने चार कोटी साठ लाखाची फसवणूक; दहा टक्क्याचे आमिष दाखवत फसवणूक

कल्याण अपराध: शेअर मार्केटमध्ये 4 कोटी 60 लाखाची फसवणूक; दहा टक्क्याचे आमिष दाखवत फसवणूक
Kalyan Crime
Kalyan CrimeEsakal

Kalyan Crime: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत अधिक टक्क्यांनी मुदतीत वाढ करण्याची योजना अनेक जण आखतात. लोकांच्या याच मानसिकतेचा फायदा घेत मुदतीवर दहा टक्के फायदा देण्याच्या नावाखाली दिडशेहून अधिक जणांची एका टोळीने फसवणूक करत 4 कोटी 60 लाखाला चूना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दाखल गुन्ह्यातील एका आरोपीला रामनगर पोलिसांनी पूणे येथून अटक केली आहे.

Kalyan Crime
Kalyan: खासदारांनी लक्ष दिल्यास ‘यु टाईप’ रस्ताचे काम लवकर, भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

रामनगर पोलिसांनी पुणे येथे सापळा रचून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनय वरटी याला अटक केली आहे. विजय याने डोंबिवलीत शेअर मार्केटींगचे कार्यालय सुरु केले होते. जवळपास दिडशेहून अधिक नागरिकांचे पैसे त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतविले.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीवर दहा टक्के व्याज मिळेल असे आमिष त्याने गुंतवणूकदारांना दाखविले होते. त्यामुळे नागरिकांनी देखील आपली गुंतवणूक तेथे केली. मात्र गुंतवलेल्या पैशांवर व्याज मिळत नसल्याने अनेक गुंतवणूकदारांनी डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच विनय हा डोंबिवलीतून फरार झाला होता.

Kalyan Crime
Navi Mumbai: एक-दोन नाही तर नवी मुंबई महापालिकेच्या १५० कोटींच्या मालमत्ता धुळ-खात!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विनय हा पुणे येथे लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. या गुन्ह्यामध्ये त्याच्यासह अजून पाच जणांचा समावेश असून यापैकी तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर दोन जणांचा शोध सुरू आहे.

मात्र या गुन्ह्याचा विनय मास्टरमाइंड असून गुन्हा दाखल होताच त्यांनी न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर न केल्याने तो पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी पुण्यात एका ठिकाणी लपून राहत होता अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांनी दिली.

Kalyan Crime
Kalyan Crime: ठाकुर्लीचा कथित बादशहा अग्नीशस्त्रांसह अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com