esakal | शेअर बाजारात घसरण; निफ्टी १५ हजारांखाली

बोलून बातमी शोधा

Share-Market-Down

सेन्सेक्स ४८ हजारांच्या पुढे; सोनं ४५ हजारांपार

शेअर बाजारात घसरण; निफ्टी १५ हजारांखाली
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: जागतिक शेअर बाजारांमधील प्रतिकूल परिस्थितीचे प्रतिबिंब आज भारतीय शेअर बाजारांमध्येही (Share Market) पडले व भारतीय निर्देशांक एक टक्क्याच्या आसपास घसरला. सेन्सेक्स (Sensex) 465 अंशांनी घसरून 48 हजार 253 अंशांवर स्थिरावला. तर 137 अंशांनी घसरलेला निफ्टी (Nifty) 14 हजार 496 अंशांवर बंद झाला. आज सेन्सेक्सच्या प्रमुख 30 समभागांपैकी नऊ समभागांचे दर वाढले तर 21 समभागांचे दर कमी झाले. (Share Market Sensex Down by 465 Points Nifty down by 137 Points)

हेही वाचा: मुंबई: व्हेंटिलेटर्स रूग्णालयात पडून; डॉक्टर्सना प्रशिक्षणच नाही...

ONGC, बजाज फायनान्स एक-दोन टक्के वाढले तर TCS, स्टेट बँक, कोटक बँक, नेस्ले, टेक महिंद्र, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट यांचे दर किरकोळ वाढले. डॉ. रेड्डी (बंद भाव 5,067 रु.), रिलायन्स (1,916), सनफार्मा (645) दोन टक्क्यांपर्यंत घसरले. एचडीएफसी व एचडीएफसी बँक, इन्फोसीस, आयटीसी, महिंद्र आणि महिंद्र हे समभागही दीड टक्क्यांच्या आसपास घसरले. आयटीसी 4 डिसेंबरनंतर आज प्रथमच 200 रुपयांखाली जात 199 रुपयांवर बंद झाला. तर महिंद्र आणि महिंद्र देखील 29 जानेवारीनंतर प्रथमच 750 च्या खाली जाऊन 741 रुपयांवर बंद झाला.

आजचे सोन्याचांदीचे दर

10 ग्रॅम सोने (24 कॅरेट) - 45,570 रु.

चांदी (1 किलो) - 70,000 रु.