esakal | सेन्सेक्स ९८३ अंशांनी घसरला; 'निफ्टी'तही घसरण

बोलून बातमी शोधा

Share Market

देशात मंदावलेली लसीकरण मोहीम आणि निवडणुकांचे एक्झिट पोल कारणीभूत

सेन्सेक्स ९८३ अंशांनी घसरला; 'निफ्टी'तही घसरण
sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई: देशातील अस्थिर परिस्थितीमुळे गुंतवणुकदारांनी आज नफा वसुलीसाठी विक्री केल्याने भारतीय निर्देशांक दोन टक्क्यांच्या आसपास घसरले. 983 अंशांनी पडलेला सेन्सेक्स आज पुन्हा 49 हजारांखाली म्हणजेच 48 हजार 782वर बंद झाला. देशात मंदावलेली लसीकरण मोहीम, निवडणुकांचे एक्झिट पोल व आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक संकेत यामुळे निफ्टीदेखील आज 263 अंशांनी कोलमडून 14 हजार 631 अंशांवर स्थिरावला.

हेही वाचा: शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ४८ हजारांवर

आज बँका आणि वित्तसंस्थांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने ते समभाग तीन ते चार टक्क्यांपर्यंत पडले. तर औषध कंपन्यांचे समभाग वधारले. सेन्सेक्समधील प्रमुख 30 समभागांपैकी फक्त ओएनजीसी सव्वाचार टक्के आणि सनफार्मा (बंद भाव 654 रु.) दीड टक्का व डॉ. रेड्डी सव्वा टक्का वाढला. अन्य सर्व 27 समभाग घसरले, यातील एचडीएफसी व एचडीएफसी बँक चार टक्क्यांच्या आसपास तर आयसीआयसीआय व कोटक बँक सव्वा तीन टक्क्यांच्या आसपास घसरले. हिंदुस्थान युनिलीव्हर, टीसीएस, महिंद्र आणि महिंद्र, एशियन पेंट दोन ते तीन टक्के घसरले तर आयटीसी (202 रु.) व रिलायन्स (1,994) यांच्या दरातही घसरण झाली.

आजचे सोन्या-चांदीचे दर

10 ग्रॅम सोने (24 कॅरेट) - 45,170 रुपये

चांदी (1 किलो) - 67,500 रुपये

(संपादन- विराज भागवत)