esakal | शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ४८ हजारांवर

बोलून बातमी शोधा

Share-Market
शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ४८ हजारांवर
sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई: देशात आणि राज्यात लॉकडाउन होणार अशा चर्चा गेले काही दिवस रंगल्या होत्या. त्यामुळे आठवड्याच्या सुरूवातीला शेअर बाजारात घसरण दिसून आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित करत लॉकडाउनचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर शेअर बाजाराने आज पुन्हा एकदा वाढ दाखवली. जागतिक शेअर बाजारांमधील अनुकूल वातावरणामुळे आज भारतीय निर्देशांकांमध्ये पाऊण टक्का वाढ झाली. सेन्सेक्स 374 अंशांनी वाढून 48 हजार अंशांच्यावर बंद (48,080) झाला तर निफ्टी 109 अंशांनी वाढला. निफ्टी आज दिवसअखेर 14,406 अंशांवर स्थिरावला.

हेही वाचा: 'मूर्खपणा चाललाय', हायकोर्टाकडून महाराष्ट्र सरकारची कानउघडणी

निफ्टीमधील प्रमुख पन्नास समभागांपैकी 27 समभागांचे दर वाढले तर 23 चे दर कमी झाले. सेन्सेक्सच्या प्रमुख 30 समभागांपैकी 19 चे दर वाढले तर 11 समभाग पडले. आज बँका व अर्थसंस्थांच्या समभागांचे दर वाढले आणि आयटी क्षेत्राच्या समभागांचे दर घसरले.

हेही वाचा: तु सिंगल आहेस? व्हेंटिलेटरसाठी मागितली मदत पण घडलं भलतचं

आयसीआयसीआय, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, कोटक बँक, बजाज फायनान्स, अ‍ॅक्सीस बँक या समभागांचे दर एक ते साडेतीन टक्के वाढले. आयटीसी, लार्सन टुब्रो, डॉ. रेड्डी या समभागांचे दरही अर्धा ते एक टक्का वाढले. हिंदुस्थान युनिलीव्हर, टेक महिंद्र, टीसीएस या समभागांचे दर एक ते दोन टक्के कमी झाले.

आजचे सोन्या-चांदीचे दर

24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) - 46,250 रु.

चांदी (1 किलो) - 70,300 रु.

(संपादन- विराज भागवत)