
Latest Mumbai News: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा हा शरीफुल शेहजादाच आहे. त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे भक्कम पुरावे गोळा केले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी मंगळवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या काही दिवसांपासून सैफ हल्ल्याप्रकरणात पोलिस तपासाबाबत संशय निर्माण करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. याबाबत पोलिस आयुक्त उत्तरे देतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले होते.