
मुंबई: राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना पंचनामे न करता शासनाने मदत जाहीर करावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणीही त्यांनी केली.