esakal | पोलिसांसमोर सिद्धार्थ शुक्लाच्या शव विच्छेदनाचं व्हीडीओ रेकॉर्डींग
sakal

बोलून बातमी शोधा

Big boss 13 fam siddharth shukla  tweet

पोलिसांसमोर सिद्धार्थ शुक्लाच्या शव विच्छेदनाचं व्हीडीओ रेकॉर्डींग

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: बिग बॉस १३ सीझनचा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla untimely death) काल ह्दयविकाराच्या (heart attack) तीव्र झटक्याने निधन झाले. तो ४० वर्षांचा होता. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक झालेल्या निधनाने सेलिब्रिटी आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह आज कुटुंबीयांच्या ताब्यात देणार असून आज अंत्यसंस्कार होतील. सिद्धार्थ शुक्लाचे काल झोपेत असतानाच निधन झाले. आदल्या रात्री त्याला अस्वस्थ (uneasy) वाटत होते. झोपण्याआधी त्याने काही औषधही (medicines) घेतली होती.

सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाचे शव विच्छेदन

गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाच्या शव विच्छेदनाला सुरुवात झाली. शव विच्छेदनाच्या या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले असून साक्षीदार म्हणून दोन पोलीसही तिथे उपस्थित होते. पाच डॉक्टरांच्या टीमने मिळून हे शवविच्छेदन केले. कुठल्या त्रुटी राहू नयेत, यासाठी दोन ते तीन वेळा अनेक गोष्टी तपासण्यात आल्या. जवळपास तीन तासापेक्षा जास्त वेळ हे शवविच्छेदन सुरु होते. डॉक्टर आता अंतिम अहवाल तयार करण्याचे काम करत आहेत.

पोलिसांना सध्या तरी सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूमध्ये काहीही संशयास्पद आढळलेले नाही. सिद्धार्थला कुठली औषधं सुरु होती का? याचा पोलीस तपास करतील. जबानी सुद्धा नोंदवण्यात येईल.

हेही वाचा: केमिकल शस्त्र वापराला भारताचा विरोध, UNSC मध्ये मांडली ठाम भूमिका

सिद्धार्थचं जुन ट्विट व्हायरल

प्रसिद्ध टिव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या Sidharth Shukla निधनाच्या काही तासांनंतर त्याचं एक जुनं ट्विट सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागलं आहे. 'मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठं नुकसान नाही. आयुष्यातील सर्वात मोठं नुकसान म्हणजे जिवंत असताना आपल्या आत एखादी गोष्ट मृत पावणे', असं ट्विट सिद्धार्थने २४ ऑक्टोबर २०१७ रोजी केलं होतं. त्याच्या या ट्विटवर चाहत्यांनी कमेंट्स करत दु:ख व्यक्त केलं आहे.

loading image
go to top