esakal | राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरण: आणखी एका आरोपीला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

रायन जॉर्न थाँर्प

राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरण: आणखी एका आरोपीला अटक

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हिचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj kundra) यांना पॉर्न फिल्म्स (porn films) तयार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) गुन्हे शाखेनं अटक केली आहे. राज कुंद्रा हे या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप आहे. याबाबत आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान या पॉर्न फिल्म्स प्रकरणात राज कुंद्रासह नेरूळमधून आणखी एकाला अटक केली आहे. (shilpa shetty husbund Raj kundra porn film cae one more accused arrested from verul dmp82)

रायन जॉर्न थाँर्प असे या आरोपीचे नाव असून हा वेरूळचा राहणारा आहे. मालवणी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

हेही वाचा: "हे बा विठ्ठला, जसे मुख्यमंत्री तुझ्या भेटीला आले तसेच..."

यापूर्वी याप्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ व मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या उमेश कामतला मालमत्ता कक्षाने पॉर्नोग्राफीप्रकरणी अटक केली होती‌. पॉर्न व्हिडीओसाठी कामतने एक ॲप तयार केला होता. यावरून तो व्हिडीओ अपलोड करायचा.

हेही वाचा: "त्यात काय मोठा पराक्रम?"; राणेंचा ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल

गहनाकडून आलेले व्हिडीओ कुठे व कसे शेअर करायचे यासाठी तो मध्यस्थ म्हणून काम पाहत होता. व्ही ट्रान्स्फरच्या माध्यमातून 2 जीबी फाइल्स मोफत शेअर केल्या जाऊ शकतात. येथील डाटा सात दिवसांत आपोआप डिलिट होतो. ही मंडळी लिंक शेअर करण्यासाठी याचाच वापर करीत होती. गहनाला एका व्हिडीओमागे 80 लाख रुपये मिळत होते. कामत हा कुंद्रा यांच्याशी संबंधित एका कंपनीत कामाला होता.

loading image