Hotel Politics: हॉटेल बुक.. रूम हाऊसफुल; शिंदे, ठाकरे अन् भाजपचे आमदार 'या' ठिकाणी थांबणार; क्रॉस वोटिंगचा धोका

Hotel politics Maharashtra For Legislative Council election: निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी सर्व पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे.
Hotel politics mh parties
Hotel politics mh parties

मुंबई- विधान परिषदेआधी हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाले आहे. आमदारांची फोडाफोड होऊ नये यासाठी सर्वच पक्ष खबरदारी घेत आहेत. निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी सर्व पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना अद्याप हॉटेल सापडले नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये थांबणार आहेत, तर भाजपचे आमदार हॉटेल ताज प्रेसिडेन्सीमध्ये थांबतील. ठाकरे गटाचे आमदार परेलच्या आयटीसी हॉटेलमधील थांबतील. एकनाथ शिंदे यांनी ६० रूम्स बुक केल्याची माहिती आहे. मुंबईतील महत्त्वाच्या हॉटेल्सच्या सर्व रुम्स बुक झाल्या असल्याने अजित पवार गटाला अद्याप हॉटेल सापडले नाही. त्यांच्याकडून हॉटेल्सचा शोध सुरू आहे.

Hotel politics mh parties
CM Eknath Shinde: "मंत्र्यांची मुलं असो किंवा कोणत्याही पक्षाशी संबंधित..."; ‘हिट अँड रन’ प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं वक्तव्य

अजित पवार गटाकडून फोर सिझन्स किंवा ललीत हॉटेलची चाचपणी सुरू झाली आहे. यातील एका हॉटेलमध्ये अजित पवार गटाचे आमदार थांबतील. याबाबत अधिकृत घोषणा आज दुपारपर्यंत होऊ शकते. महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात आहेत. ११ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान क्रॉस वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे.

Hotel politics mh parties
Vidhan Parishad Election: विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची शक्यता; काय आहे जागांचे गणित?

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. याच दिवशी निकाल जाहीर होईल. पण, या दिवशी आमदारांची फोडाफोडी होण्याची दाट शक्यता आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांनी देखील अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाले आहेत. कोणत्या आमदाराला हार पत्करावी लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजपकडे पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण संख्याबळ आहे. एका उमेदवाराला जिंकण्यासाठी २३ मतांची आवश्यकता आहे. शिंदे गटाचे दोन आमदार निवडून येऊ शकतात. काँग्रेसचा एक उमेदवार रिंगणात आहे. ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांनी जिंकून येण्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावल्याचं दिसत आहे. मिलिंद नार्वेकर निवडून येतात का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com