शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वर्षावर अकाली दलासोबत खलबतं

पूजा विचारे
Sunday, 6 December 2020

शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट  घेतली आहे. वर्षा बंगल्यावर त्यांची भेट झाली आहे. 

मुंबईः केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आज दहाव्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे. शनिवारी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी पार पडली. सध्या केंद्र सरकारने लागू केलेला कृषी कायदा मोडीत काढण्यासाठी देशातील सर्व स्थानिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची  शिरोमणी अकाली दलाचे नेते  भेट घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट  घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा बंगल्यावर त्यांची भेट झाली आहे. 

या भेटीनंतर प्रेमसिंग चंदू माजरा यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की,  शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्येही शिवसेना सहभागी होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

पुढे माजरा म्हणालेत की, केंद्र सरकारने लागू केलेला कृषी कायदा मोडीत काढण्यासाठी देशातील सर्व स्थानिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आम्ही भेट घेत आहोत. सर्व पक्षांनी एकत्र यावे, यासाठी आम्ही हे आव्हान करत आहोत. 
शिरोमणी अकाली दलानं घेतलेली भूमिका मान्य असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, असंही माजरा यांनी सांगितलं आहे. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दिल्लीत समन्वय बैठक होणार असून त्या बैठकीसही शिवसेना सहभागी होणार आहे. या बैठकीस मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं आहे, असं माजरा म्हणालेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही आम्ही भेट घेणार आहोत. मात्र ती झाली नाही तर दिल्लीमध्ये आम्ही देशातील सर्व स्थानिक राजकीय पक्षांची बैठक घेणार आहोत. त्या बैठकीचे नेतृत्व शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल हे करणार असल्याची माहितीही माजरा यांनी दिली.

अधिक वाचा-  शेतकरी आंदोलनाला महामुंबईच्या रिक्षा संघटनांचाही पाठिंबा! मंगळवारी बंदचे आवाहन

दिल्लीत होणाऱ्या बैठकीस शरद पवारांपासून ममता बॅनर्जीपर्यंत अनेक पक्षांचे प्रमुख नेते, पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ही बैठक पुढील दोन महिन्यात होणार असल्याचंही माजरा यांनी सांगितलं आहे.

Shiromani Akali Dal met Maharashtra CM Uddhav Thackeray today
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiromani Akali Dal met Maharashtra CM Uddhav Thackeray today