शेतकरी आंदोलनाला महामुंबईच्या रिक्षा संघटनांचाही पाठिंबा! मंगळवारी बंदचे आवाहन

शेतकरी आंदोलनाला महामुंबईच्या रिक्षा संघटनांचाही पाठिंबा! मंगळवारी बंदचे आवाहन

ठाणे - केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला डोंबिवलीतील लालबावटा रिक्षा चालक मालक युनियननेही पाठींबा दिला आहे. शहरातील सुमारे एक हजार रिक्षा चालकांनी रिक्षावर जय जवान जय किसान असे फलक झळकावीत शेतकऱ्यांना पाठिंबा देऊ केला आहे. शेतकऱ्यांनी येत्या 8 डिसेंबरला भारत बंदचे आवाहन केले असून लालबावटा रिक्षाचालकही मंगळवारी रिक्षा बंद ठेवून या आवाहनाला प्रतिसाद देणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष काळू कोमस्कर यांनी सांगितले. 

कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारची शेतकरी संघटनांची चर्चा झाली आहे. सरकार या कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यास तयार आहे, मात्र सरकारने तीन्ही कायदे मागे घ्यावेत अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. यामुळे शेतकरी संघटना अद्याप मागे हटल्या असून आपल्या मागण्यांसाठी येत्या मंगळवारी 8 डिसेंबरला शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. डोंबिवलीतील लालबावटा रिक्षाचालक मालक संघटनांनीही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दर्शविला असून शहरात सध्या रिक्षांवर जय जवान जय किसान चे फलक झळकत आहेत. हे फलक कल्याण डोंबिवलीकरांचे लक्ष नक्कीच वेधून घेत असून कल्याण डोंबिवलीकरांनीही या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शवावा असे आवाहन रिक्षा चालकांच्यावतीने करण्यात येत आहे.

मंगळवारी भारत बंदच्या दिवशी डोंबिवलीतील रिक्षा व्यवसाय बंद ठेवून भारत बंदला पाठींबा देण्यात येणार असल्याचे नुकतेच संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. शहरातील इतर रिक्षा चालक मालक संघटनांनाही या बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती लालबावटाच्यावतीने केली जात असल्याचे युनियनचे सदस्य महेश आवारे यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com