शितल भानुशाली यांच्या मृत्यूंचे गुढ वाढले, आता पुढील तपास पोलिसांकडून होणार

समीर सुर्वे
Wednesday, 28 October 2020

यासंदर्भातील सीसीटीव्ही देखील उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर हा नाला मिठी नदीला मिळतो.

मुंबई,ता.२८ : घाटकोपरमधील असल्फा येथे नाल्यात पडून मृत्यू झालेल्या शितल भानुशाली यांच्या मृत्यूंचे गुढ वाढले आहे. भानुशाली यांना नाल्यात पडताना कोणीही पाहिलेले नसून तसेच त्यांचा मृतदेह माहिम खाडीच्या परीसरात मिळण्याची शक्यता असताना हाजीअलीला मिळणे आश्‍चर्याकारक आहे. त्यामुळे आता पुढील तपास पोलिसांमार्फत हाेणार आहे.

ऑक्टोबरच्या ३ तारखेला मुंबईत झालेल्या धुवाधार पावसाता शितल भानुशाली या असल्फा येथे मेट्रो मार्गाखाली उभ्या असताना उघड्या गटरात पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी भानुशाली यांचा मृतदेह हाजीअली येथील समुद्र किनाऱ्याला सापडला. भानुशाली या उघड्या नाल्यात पडल्याची शक्यता त्यांच्या नातेवाईकांनी वर्तवल्यामुळे महानगर पालिकेने या प्रकरणी चाैकशी सुरु केली. मात्र, भानुशाली उघड्या नाल्यात पडल्याचे प्रत्यक्षदर्शी आढलले नाहीत.

महत्त्वाची बातमी : आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून दिले जीवनदान, मातेची यशस्वी प्रसूती

यासंदर्भातील सीसीटीव्ही देखील उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर हा नाला मिठी नदीला मिळतो. या नाल्यास साकिनाका येथे कचरा अडकण्यासाठी जाळी असून ही जाळी रोज साफ केली जाते. त्यामुळे मृतदेह या जाळीत अकडण्याची शक्यता होती. तसेच तो २० ते २२ किलोमिटर दुर हाजीअलीला मिळणे याबद्दलही अहवालात शंका उपस्थीत करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये बृहन्मुंबई महानगर पालिका आता अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करणार असून असून पुढील तपास पोलिसांमार्फत होणार आहे.

shital bhanushali death case registered against unknown person further investigation will be done by mumbai police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shital bhanushali death case registered against unknown person further investigation will be done by mumbai police