Shital Mhatre: शिल्लक सेनेला असे मेसेज करून...; रश्मी ठाकरेंच्या कार्यक्रमावर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmi Thackeray - Shital Mhatre

Shital Mhatre: शिल्लक सेनेला असे मेसेज करून...; रश्मी ठाकरेंच्या कार्यक्रमावर टीका

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या नवरात्रीनिमित्त ठाणे येथील टेंभीनाक्याच्या दर्शनासाठी जात आहेत. त्यामुळे आता ठाण्यात शिंदे गट आणि शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता आहे. रश्मी ठाकरे यांच्यांकडून येथील देवीची आरती होणार आहे तर शिंदे गटाकडून आरतीसाठी वेळ राखून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

(Uddhav Thackeray vs Eknath Shinde)

दरम्यान, शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी रश्मी ठाकरे यांच्या कार्यक्रमावर मिश्किल टीका केली असून "अरेरे..मा.रश्मी वहिनी ठाण्याला जाणार आहेत म्हणून शिल्लक सेनेला असे msgs करुन मुंबई मधून महिला गोळा करुन गर्दी दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करावा लागत आहे..." अशी टीका शितल म्हात्रे यांनी केली आहे.

रश्मी ठाकरे यांच्याकडून आज दुपारी ३ वाजता आरतीच्या कार्यक्रम होणार असून शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या नावाने वेळ आरक्षित केली आहे. त्यामुळे आता या दोन गटात सामना पाहायला मिळणार की रश्मी ठाकरे आपला दौरा रद्द करणार? याकडे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांच्याकडून ट्वीट करण्यात आलेल्या स्क्रीनशॉटमध्ये रश्मी ठाकरे यांच्या कार्यक्रमास हजर राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे. तर बोरिवली येथून ठाण्याला येण्यासाठी एसी बसची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे म्हात्रे यांनी रश्मी ठाकरेंच्या या कार्यक्रमावर निशाणा साधला आहे.