'या' ठिकाणीही सुरू झालंय शिवभोजन केंद्र!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 मार्च 2020

गरीब आणि गरजूंना केवळ दहा रुपयांत जेवणाची थाळी देणारे "शिवभोजन' केंद्र कामोठे सेक्‍टर- 6 या ठिकाणी सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्‌घाटन कामोठे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांच्या हस्ते पार पडले. 

खारघर : गरीब आणि गरजूंना केवळ दहा रुपयांत जेवणाची थाळी देणारे "शिवभोजन' केंद्र कामोठे सेक्‍टर- 6 या ठिकाणी सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्‌घाटन कामोठे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांच्या हस्ते पार पडले. 

ही बातमी वाचली का? भिवंडी पालिका ठेकेदारावर मेहेरबान

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेच्या पनवेल तालुका महिला उपमहानगर संघटक रिना राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक भगवान बडगुजर, नवी मुंबई ब्लड बॅंकेचे पदाधिकारी डॉ. किशोर बडगुजर, खारघर सेक्‍टर- 19 चे शिवसेना शाखाप्रमुख सचिन द. पाटील, अविनाश बडगुजर, भूषण गोसावी, संगीता खाडे, राजेंद्र पाटील, विकास भंगाळे, अजय काप्रे यांच्यासह शिवभोजनाचे केंद्राचे पांडुरंग काळे उपस्थित होते. 

ही बातमी वाचली का? पोलिसाच्या हत्येप्रकरणी तरूणास जन्मठेप

नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवभोजन योजनेची घोषणा केल्यानंतर मंत्रिमंडळाने शिवभोजन योजनेला मान्यता दिली. त्यानंतर राज्यभर अनेक ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. शिवसेनेने दिलेल्या वचननाम्यानुसार कामोठे परिसरातील गरिबांना दहा रुपयात शिवभोजन केंद्रातून जेवणाची थाळी मिळणार आहे. हे केंद्र कामोठे सेक्‍टर- 6 ए मधील इंद्रधाम को- ऑप. हौ.सो., प्लॉट नं.67, शॉप नं. 6 या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात शिवभोजनाचा लाभ गोरगरिबांना घेता येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Bhojan Kendra started in kamothe panvel