शिवसैनिकांनो तयार रहा; राज्यात एकहाती भगवा फडकवायचाय - उद्धव ठाकरे

तुषार सोनवणे
Wednesday, 28 October 2020

शिवसैनिकांनो तयार रहा, राज्यात एकहाती भगवा फडकवण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राज्यातील शिवसैनिकांमध्ये चांगलाच उत्साह संचारल्याचे चित्र आहे. राज्यातील सत्ता तीन पक्षांच्या महाविकास आघाडीकडे असली तरी, शिवसैनिकांनो तयार रहा, राज्यात एकहाती भगवा फडकवण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

सामान्यांसाठी लवकरच लोकल सुरु होणार, ठाकरे सरकार देणार दिवाळी गिफ्ट?

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सारे काही अलबेल असले तरी, तीन पक्षांचे सरकार नक्की किती दिवस तग धरेल याबाबत राजकिय वर्तुळात होत असते. त्यातच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती.

लैंगिक अत्याचाराला आळा घालण्यासाठी पोलिसांचा पुढाकार, महिलांशी संपर्क साधण्यास सुरुवात

मंगळवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. ही चर्चा साधारण मध्यरात्री पर्यंत सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेत ठाकरे यांनी राज्यात एकहाती भगवा फडकवणार असून, त्यासाठी शिवसैनिकांनी तयार रहावे असे म्हटले आहे. ठाकरे यांनी एकहाती भगवा फडकवण्याची भाषा ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला कितपत रुचेल याबाबत चर्चांना उधान आले आहे. 
--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sainiks be ready Uddhav Thackeray wants to spread saffron in the state