मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरु, आदित्य ठाकरेंची महाबैठक

समीर सुर्वे
Thursday, 7 January 2021

मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीत तयारी शिवसेनेने सुरु केली आहे. मुंबई आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून गुरुवारी त्यांनी महापालिकेच्या मुख्यालयात महाबैठक घेतली.

मुंबई: मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीत तयारी शिवसेनेने सुरु केली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून गुरुवारी त्यांनी महापालिकेच्या मुख्यालयात महाबैठक घेतली. या बैठकीत शहरात सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. पुढील 30 वर्षांचा विचार करुन मुंबईत विकास कामे करण्यात येत असून शहराचे सौर्द्यजपून,पुरमुक्त करण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जाणार आहेत. त्याच बरोबर मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार असून बाहेरुन येणाऱ्या खासगी बसेसना शहरात प्रवेश न देता त्या जकात नाक्यावर ‘बस हब ’तयार करुन थांबविण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले.

महापालिका मुख्यालयात आज आदित्य ठाकरे यांनी शहरातील विकास कामांचा आढावा घेऊन पत्रकार परिषदेत विकास कामांबाबत माहिती दिली. मुंबईतील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जपानच्या धर्तीवर भूमिगत तलाव तयार करण्यासाठी जागा निश्‍चित करणे, मिठी नदीवरील मिनी पंपिंग स्टेशन प्रमाणे शहरातील विविध मिनी पंपिंग स्टेशन बांधणे अशी कामे युध्द पातळीवर करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्याच बरोबर मुंबईतील 368 फ्लोटिंग पॉईंटवर सुरु असलेल्या उपाय योजनांचा आढावाही त्यांनी घेतला. ब्रिमस्ट्रोवॅड अंतर्गत माहूल आणि मोगारा नाला येथे पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. माहूल येथील भूखंड केंद्र सरकारकडून अद्याप मिळालेला नसून त्यासाठी पत्रव्यवहार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, उपमहापौर सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव, बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्यासर्व सर्व अतिरिक्त आयुक्त आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

डोक्यावरील मृत्यूची छाया हटणार

मुंबईतील हवेतील वीज तसेच इतर वाहिन्यांच्या जाळ्यांबाबत ‘सकाळ’ने वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अखेरीस आदित्या ठाकरे यांनी या समस्येकडे लक्ष दिले आहे. पुढील 15 दिवसात अशा बेकायदा वाहिन्या हटविण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
 
बेस्ट पालिकेत समन्वय

तोट्यात असलेल्या बेस्टसाठी आर्थिक उपाय योजना सुचविण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. त्याच बरोबर पालिका आणि बेस्टमध्ये समन्वय राखण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.  

हेही वाचा- 'नामांतराच्या मुद्द्यावर विचारुनच, शहानिशा करुनच वक्तव्य करेन'

ही कामे होणार

  • नागरिकांना मुक्तपणे वावरता यावे म्हणून पदपथ सुयोग्य करण्यात येणार आहेत.
  • वीज निर्मितीसाठी पवनचक्का, सौर उर्जेचा वापर करणार.
  • खासगी इमारतींमध्ये सौर उर्जा प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहन
  • बेस्ट,मेट्रो या सेवांचे सुसूत्रीकरण करुन इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब तयार करुन कॉमन तिकीट प्रकल्प राबविण्यात येणार.
  • जकात नाक्यांच्या मोकळ्या भुखंड्यावर ट्रान्सपोर्ट हब तयार करणे.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Shiv Sena begins preparations bombay Municipal Corporation elections Aditya Thackeray general meeting


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena begins preparations bombay Municipal Corporation elections Aditya Thackeray general meeting